36 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home गुन्हेवार्ता प्रेमसंबंधातून २२ वर्षीय युवकाचा शेगावात खून

प्रेमसंबंधातून २२ वर्षीय युवकाचा शेगावात खून

0
26

blank

बुलढाणा,दि.7: एका २२ वर्षीय युवकाचा निर्दयी पणे खून करण्यात आल्याची घटना रविवारी रात्री बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे उघडकीस आली.या घटनेला अंजाम देणारा आरोपी मात्र घटनास्थळावरून पसार होण्यात यशस्वी झाला असून ही हत्या प्रेमसंबंधातून घडल्याचे बोलल्या जात आहे. शेख शोहेब शेख सलीम वय २२ रा बाजारफैल शेगाव असे घटनेतील मृतकाचे नाव आहे.सदर युवक हा स्थानिक पेट्रोलपंपावर कामाला होता. रविवारी सायंकाळी तो आपल्या काही मित्रांसोबत जगदंबा चौकातील माउली टॉवर मधील राहुल खंडेराव यांच्या दुकानात चहा आणि सिगारेट पिण्यासाठी नित्यनियमाप्रमाणे गेला होता. दरम्यान दानिश जव्वा शेख नावाच्या इसमाने वाद घालून आपल्या कंदील चाकूने शोएबच्या गळ्यावर वार केले. यात क्षणार्धात दुकानात रक्ताचा सडा पसरला. यामध्ये तो जागीच ठार झाला. दरम्यान आरोपींने घटनास्थळावरून पळ काढला. घटनेच्या वेळी दुकानात आरोपी दानिश सोबत आणखी २ युवक होते. पुढील तपास दाणेदार डी. डी. ढाकणे हे करीत आहेत.

blank