35.7 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home विदर्भ वऱ्हाडी वाहनाला अपघात, ४० ते ५० जखमी

वऱ्हाडी वाहनाला अपघात, ४० ते ५० जखमी

0
25

blank

आल्लापल्ली,दि.09 -आल्लापली- सिरोंचा मार्गावरील मोसमजवळ आज(दि.०९) सकाळी 9.30 वाजताच्या दरम्यान लग्नाचे वर्हाड असलेले वाहन झाडाला आढळून अपघात झाल्याची घटना घडली.या अपघातात ४० ते ५० वराती जखमी झाले असुन प्राथमिक उपचाराकरिता त्यांना उपजिल्हा रुग्णालय अहेरी येथे हलवण्यात आले आहे. लग्न वर्हाडी हे झिंगानूर वरून गडचिरोलीला निघाले होते. दरम्यान चालकाचा संतुलन बिघडल्याने मोसम जवळ वाहन झाडावर आदळले.मागील 5 दिवसात याच परिसरात 3 अपघात झाले आहे काही दिवसांपूर्वी असेच अपघाताचे प्रमाण लगाम ते चवडमपल्ली या रोडवर वाढले आहे.

blank