24.2 C
Gondiā
Sunday, August 9, 2026
Home विदर्भ सहा. पोलिस उपनिरीक्षक कावळे ‘ बेस्ट टेक्निशियन ऑफ द इयर’ चे मानकरी

सहा. पोलिस उपनिरीक्षक कावळे ‘ बेस्ट टेक्निशियन ऑफ द इयर’ चे मानकरी

0
29

गडचिरोली,दि.10ःनवी दिल्ली येथे २६ एप्रिल ते ३ मे दरम्यान नॅशनल इन्वेस्टींगेशन एजन्सीमार्फत आयोजित रष्ट्रीय पातळीवर ३ र्‍या राष्ट्रीय सी-आय.ई.डी. स्पध्रेत गडचिरोली पोलिस दलातील सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक किशोर कावळे यांनी ‘बेस्ट बॉम्ब टेक्निशियन’म्हणून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले. त्यांच्या यशाबद्दल पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी किशोर कावळे यांचे कौतूक करीत अभिनंदन केले.
सदर स्पर्धा देशभरातून एकूण १२ संघानी सहभाग नोंदविला होता. महाराष्ट्राच्या १५ जणांच्या टीममध्ये गडचिरोली पोलिस दलाच्या बॉम्ब शोधक पथकातील पोलिस उपनिरीक्षक विर्शाम मदने, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक किशोर कावळे व पोलिस शिपाई राहूल किरंगे यांचा सहभाग होता. या स्पध्रेत अतिशय मेहनत घेऊन उरतलेल्या महाराष्ट्र पोलिस दलाने उत्कृष्ट आईडी बनवत सर्वाचे लक्ष वेधून घेतले. यात पोलिस उपनिरीक्षक किशोर कावळे यांनी बेस्ट बॉम्ब टेक्निशयन म्हणून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले. या जणांच्या टीमचे गडचिरोलीत आज आगमन झाले असता पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी कौतूक करीत अभिनंदन केले.

blank