24.8 C
Gondiā
Friday, July 31, 2026
Home गुन्हेवार्ता काटी रेल्वेस्थानकाशेजारी आढळला डॉ.सुरज पाल यांचा मृतदेह

काटी रेल्वेस्थानकाशेजारी आढळला डॉ.सुरज पाल यांचा मृतदेह

0
27

गोंदिया,दि.२०ः-गोंदिया शहरातील प्रसिध्द वैद्यकिय व्यवसायिक डॉ.सुरज पाल हे नियमितप्रमाणे आज २० मे रोजी सुध्दा मार्निंगवॉककरीता सकाळी घरून निघाले होते.त्यांचा मृतदेह शहरापासून २२ किमी अंतरावरील काटी रेल्वेस्थानकाशेजारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास आढळल्याने खळबळ माजली आहे.
येथील रानी अवंतीबाई पॅरामेडिकल कॉलेजचे संचालक असलेले डॉ.पाल हे होमियोपॅथीक डॉक्टर होते.ते नियमितप्रमाणे आजही सकाळी फिरायला निघाले मात्र घरी पोचले नाही.उलट त्यांचा मृतदेहच काटी रेल्वेस्थानक शेजारी असलेल्या पंपहाऊस शेजारी आढळला.त्याची माहिती लगेच रेल्वेस्टेशन मास्टर गणेश प्रधान यांना मिळताच त्यांनी गोंदिया रेल्वे पोलीसांना माहिती दिली.पोलीसांनी वेळ न गमावता घटनास्थळ गाठून तपास सुरु केले असता त्यांची ओळख पटल्यावर कुटुबियांना माहिती देण्यात आली.याप्रकरणात मृतदेह उत्तरीय तपासणीकरीता शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात पाठविण्यात आले असून पोलीसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करीत तपासाला सुरवात केली आहे.त्यांच्या मृत्यूचे कारण मात्र अद्यापही स्पष्ट असून त्यांच्या शरीरावर कुठल्याही खुणा नसल्याने हृदयविकाराच्या आघाताने मृत्यू झाला असावा असा अंदाज वर्तविण्यात येत असला तरी उत्तरीय तपासणीनंतरच खरे स्पष्ट होणार असल्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक जितेंद्र गाढवे यांनी सांगितले.