33.9 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ मेवानींच्या उपस्थितीत आज नागपूर व गोंदियात मानवाधिकार परिषद

मेवानींच्या उपस्थितीत आज नागपूर व गोंदियात मानवाधिकार परिषद

0
28

नागपूर/गोंदिया,दि.29ः-गुजरात विधानसभा निवडणूक गाजवणारे आमदार जिग्नेश मेवानी यांच्या उपस्थितीत आज, मंगळवारी ‘मानवाधिकार परिषद’ होणार आहे. रिपब्लिकन युथ फेडरेशन व रिपब्लिकन स्टुडंट्स फेडरेशनच्यावतीने आयोजित परिषदेचे उद्घाटन उत्तर अंबाझरी मार्गावरील अमृत भवनात सकाळी ११.३० वाजता होईल.राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे अध्यक्षस्थानी असतील. रिपब्लिकन विचारवंत रमेश जीवने, आयटकचे नेते श्याम काळे, भगतसिंह विचार मंचचे गुरप्रितसिंह, राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे विदर्भ संयोजक नीलेश देशभ्रतार, दलित मुस्लिम एकता मंचचे नेते अफझल फारुख प्रमुख पाहुणे राहतील.परिषदेला कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन फेडरेशनचे राहुल जारोंडे, क्षितिज गायकवाड, अमिल भालेराव, नितेश मेश्राम, प्रतिक डोर्लीकर, राजस खोब्रागडे, आशिष मेश्राम, कबीर मेश्राम, संकेत अलोणे, निखिल डोंगरे यांनी केले आहे.

तर गोंदिया येथे ड़ाॅ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीच्यावतीने सायकांळी 7 वाजता भीमनगर मैदानावर आमदार जिग्नेश मेवानी यांच्या मार्गदर्शन शिबिराचे आयोजन समितीचे अध्यक्ष धीरजकुमार मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले आहे.या कार्यक्रमाला जनतेने मोठ्या सख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मिलींद गणवीर,निलेश देशभ्रतार,अनिल सुखदेवे आदींनी केले आहे.

blank