24.6 C
Gondiā
Friday, July 31, 2026
Home Top News भाजपचे राजेंद्र गावित 45 हजार मतांनी विजयी, शिवसेना पराभूत

भाजपचे राजेंद्र गावित 45 हजार मतांनी विजयी, शिवसेना पराभूत

0
29

मुंबई,दि.31- पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार राजेंद्र गावित यांनी 44 हजार 500 मतांनी विजय मिळवला आहे. गावित यांनी शिवसेनेच्या श्रीनिवास वनगा यांना पराभूत केले. आज सकाळी पहिल्या राऊंडपासूनच भाजपच्या राजेंद्र गावित यांनी आघाडी घेतली होती. अखेर त्यांनी विजय खेचून आणला आहे. शिवसेनेच्या श्रीनिवास वनगा यांनीही भाजपला काँटे की टक्कर दिली. शिवसेनेने अडीच लाखांहून अधिक मते मिळवत भाजपला काय द्यायचा तो संदेश दिला आहे. बहुजन विकास आघाडी (बाविआ) ने सुद्धा चांगली मते खेचली. मात्र, त्यांना तिस-या क्रमांकावर समाधान मानावे लागले.