तेराव्या फेरीत 8 हजाराने कुकडे आघाडीवर!

0
14

गोंदिया/भंडारा,दि.31ः-भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीकरीता झालेल्या मतदानाच्या मतमोजणीच्या फेर्यांना सुरवात झाली आहे.तिरोडा विधानसभा मतदारसंघ वगळता भाजप आमदाराला कुठेच आघाडी मिळताना दिसून येत नाही.तर तेराव्या फेरीअखेर राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे हे 18 हजाराने आघाडी घेतल्याची माहिती येत आहे.अद्याप 20 फेरीचे निकाल येणे बाकी आहे.पहिल्या फेरीत मधुकर कुकडे यांना 18028 (राष्ट्रवादी काँग्रेस) तर हेमंत पटले यांना 17246(भाजप) मते मिळाली.दुसर्या फेरीमध्ये कुकडे यांना 35512 व पटले यांना 33306 मते तिसरी फेरीत राष्ट्रवादीचे कुकडे यांना 51219,भाजपचे हेमंत पटेल यांना 48382 मते मिळाल्याची अधिकृत माहिती जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने देण्यात आली आहे.चौथ्या फेरीमध्ये राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे यांना ६७०६१ हजार मते,भाजपचे हेमंत पटले यांना ६४००७,बळीराजा पार्टीचे नंदलाल काडगाये यांना ३६९,भारीपचे एल.के.मडावी यांना ४८८२ मते मिळाली आहेत. पाचव्या फेरीमध्ये मधुकर कुकडे यांना ८५१६०,भाजपचे हेमंत पटले यांना ८०१३१,बळीराजा पार्टीचे नंदलाल काडगाये यांना ३९८ तर भारीपचे एल.के.मडावी यांना ६४०६ मते मिळाली आहेत.