25.3 C
Gondiā
Saturday, August 1, 2026
Home मराठवाडा/खान्देश महासभेच्या जिल्हा कार्यकारणी साठी निवड

महासभेच्या जिल्हा कार्यकारणी साठी निवड

0
36

जिंतुर,दि.23ः- परभणी जिल्हा आर्य वैश्य महासभा नूतन कार्यकारणी साठी जिंतुर शहरातून चौघांची निवड करण्यात आली.महारास्ट्र आर्य वैश्य महासभा या आर्य वैश्य समाजाच्या सर्वोच्च संस्थेचे गावस्तरा पर्यंत विस्तार करणे चालू असून राज्यातील सर्व गावातून सदस्य निवडून जिल्हा स्तर कार्यकारिणी सदस्य निवडीचे काम चालू आहे. त्या अनुषंगाने येथील श्री नगरेश्वर मंदिरात सखाराम चिद्रवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. या बैठकीत सर्वानुमते बिनविरोध संजय बावुराव कोकडवार,गजानन रामकृष्ण कोकडवार, रूपेश कांतराव चिद्रवार, संतोष विजयकुमार वट्टमवार, जिंतुर यांची निवड करण्यात आली.महासभेचे उपाध्यक्ष किरण वट्टमवार राज्य प्रसिद्धि प्रमुख प्रदिप कोकडवार यांच्या सह कांता कोकडवार, प्रवीण वट्टमवार सुनिल वट्टमवार अशोक चिद्रवार यांच्या सह सर्व समाज बान्धव उपस्थित होते.