25.1 C
Gondiā
Saturday, August 8, 2026
Home गुन्हेवार्ता प्रसुती रजेचे बिल काढण्यासाठी दोन हजाराची लाच आरोपी जाळ्यात

प्रसुती रजेचे बिल काढण्यासाठी दोन हजाराची लाच आरोपी जाळ्यात

0
26

सिरोंचा,दि.३१-प्रसुती राजेची बिल काढण्यासाठी दोन हजार ची लाच स्वीकारताना मोयाबीनपेठा येथील आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या औषध निर्माण अधिकाºयास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच रंगे हात अटक केली आहे. श्रीनिवास वेंकटय्या गटला (४६) असे लाचखोर औषधी निर्माण अधिकाºयांचे नाव आहे.प्राप्त माहितीनुसार तालुक्यातील मोयाबीन पेठा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत महिला कर्मचाºयाची प्रसुती रजेची बिल काढण्यासाठी तक्रारकर्त्यांनी औषधी निर्माण अधिकारी गटला याची भेट घेतली. त्यांनी सदर बिल काढण्यासाठी तक्रार कत्यास अडीच हजार रूपयांची मागणी केली. तडीजोडीनंतर तक्रारकर्ता २ हजार रूपये देण्यास तयार झाले. परंतु तक्रारकर्त्यांची लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. तक्रारीनुसार लाच-लुचपत विभागाच्या अधिकाºयांनी रचून आज तालुका आरोग्य अधिकाराच्या कार्यालयात गटला यांना लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली. याबाबत सिरोंचा पोलिस ठाण्यात श्रीनिवास गटला याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सदर कारवाई पोलीस निरीक्षक टेकाम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली-