37.1 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ पवार प्रगतीशिल मंचच्यावतीने वृक्षारोपण

पवार प्रगतीशिल मंचच्यावतीने वृक्षारोपण

0
32

blank

गोंदिया,दि.31 : येथील पवार प्रगतीशिल मंचच्यावतीने राज्यशासनाने घोषित केलेल्या १३ कोटी वृक्ष लागवड योजनेअंतर्गत पवार सांस्कृतीक भवनाच्या प्रांगणात विविध प्रजातीचे वृक्ष लागवड करण्यात आले.पवार प्रगतीशिल मंच च्यावतीने प्रत्येक वर्षी विविध उपक्रम राबविले जातात. यासाठी संस्थेचे सचिव प्राध्यापक डॉ.संजीव रहांगडाले हे नेहमी अग्रेसर असतात. त्याच्याच मार्गदर्शनात पवार सांस्कृतीक भवनात वृक्षारोपण कार्यक्रम (दि.२९) राबविण्यात आला. तसेच यावेळी स्वच्छता अभियानही पार पाडण्यात आला.
संस्थेचे अध्यक्ष डॉ.वैâलाश हरिणखेडे, प्रा. एच.एच.पारधी, नगरसेविका मैथुला बिसेन, संजीव रहांगडाले, प्रा.किशोर भगत, राजेश चव्हाण, सुरेश भक्तवर्ती,बाबा बिसेन, राजेश राणे,लता रहांगडाले, सौ.धनिषा कटरे, सविता तुरकर,महेंद्र बिसेन,अॅड. पृथ्वीराज चव्हाण, गोविंद येडे, छत्रपाल चौधरी, पंकज पटले, प्रिती गौतम, गुलाब ठाकूर, सोनू येडे, डॉ.प्रशांत कटरे, योगेश ठाकरे, प्रखर चव्हाण,  पारखदास पटले यांच्यासह पवार नवयुवक समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

blank