25.2 C
Gondiā
Friday, July 31, 2026
Home Top News राजाराम परिसरात मिळाले नक्षल बॅनरसह पत्रके

राजाराम परिसरात मिळाले नक्षल बॅनरसह पत्रके

0
28

गडचिरोली,दि.03ः- जिल्हात नक्षल सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी आज ०३ ऑगस्टला अहेरी तालुक्यांतर्गत येत असलेल्या राजाराम परिसरात सकाळच्या सुमारास नक्षल बॅनर व पत्रके मिळाली आहेत. मुलचेरा तालुक्यात नक्षलांकडुन स्पोट घडवून आणला होता. नक्षल सप्ताहा दरम्यान शहरी भागातील व्यक्ती ग्रामीण भागात जाण्यास टाळाटाळ करतात.
पत्रकात लिहिल्याप्रमाणे नक्षल चळवळीला या वर्षात सर्वात मोठा हादरा बसला असल्याने नक्षलांनी प्रत्येक घरातुन एक सैनिक तयार करू असे लिहिले आहे. ग्रामीण भागात पोलीसांनी केलेल्या जनजागृतीमुळे आदिवासी जनता व युवक नक्षल्यांचा विरोध करीत असल्याने नक्षल्यामध्ये असंतोष दिसून येत आहे.