26.9 C
Gondiā
Sunday, August 2, 2026
Home विदर्भ २५ ऑगस्टला ओबीसी सघंर्ष कृती समितीची जिल्हा बैठक

२५ ऑगस्टला ओबीसी सघंर्ष कृती समितीची जिल्हा बैठक

0
25
गोंदिया,दि.22: गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समितीच्यावतीने येत्या २५ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता स्थानिक विश्रामगृहात जिल्हास्तरीय कार्यकारीणीचा विस्तार आणि नव्याने गठण करण्यासह तालुकाध्यक्षांची निवड करण्याकरीता जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.या बैठकीला गोंदिया जिल्ह्यातील सर्व ओबीसी संघर्ष कृती समिती,ओबीसी सेवा संघ व राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या कार्यकत्र्यांनी बैठकिला उपस्थित राहावे.सोबतच  ११ एप्रिल ते १० मे २०१७ दरम्यान राबविण्यात आलेल्या ‘ओबीसी सदस्यता नोंदणी अभियानङ्क च्या पावतीपुस्तक या बैठकीला येताना घेऊन येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.ही बैठक विद्यमान जिल्हाध्यक्ष बबलू कटरे व कार्याध्यक्ष अमर वराडे यांच्या प्रमुख उपस्थित होणार असल्याने या बैठकिला ओबीसी, युवक, युवती, विद्यार्थी, शेतकरी, कर्मचारी, अधिकारी, सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मार्गदर्शक खेमेंद्र कटरे यांनी केले आहे.