27.2 C
Gondiā
Sunday, August 2, 2026
Home Featured News आमटे दाम्पत्य ‘केबीसी’ मध्ये सहभागी होणार

आमटे दाम्पत्य ‘केबीसी’ मध्ये सहभागी होणार

0
41

गडचिरोली,दि.२३=सर्वाधिक लोकप्रिय रिअँलिटी शो ठरलेला ‘कौन बनेगा करोडपती’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्याची सुरुवात अत्यंत वेगळ्या पद्धतीने होणार आहे. समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे व मंदाकिनी आमटे हे दाम्पत्य ‘केबीसी’मध्ये सहभागी होणार आहे.
‘केबीसी’चे सूत्रसंचालक महानायक अमिताभ बच्चन यांनी स्वत: ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. ‘डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदाकिनी आमटे या दोन मोठय़ा माणसांच्या सहवासात जवळपास तासभर राहण्याचे भाग्य मला नुकतेच लाभले, त्यांचे जीवन आणि आदिवासींसाठी ते करत असलेले काम अत्यंत प्रेरणादायी आहे. आपण कल्पनाही करू शकत नाही असे काम ते करताहेत. केबीसीच्या ‘कर्मवीर’ भागाच्या निमित्ताने ते माझ्यासोबत होते, असेही अमिताभ बच्चन यांनी म्हटले आहे.
येत्या ७ सप्टेंबरला या भागाचे प्रक्षेपण केले जाणार आहे. डॉ. प्रकाश आमटे यांचे बंधू समाजसेवक विकास आमटे यांनी अमिताभ यांच्या ट्विटला रिट्विट करत हा कार्यक्रम नक्की पाहा, असे आवाहन केले आहे.