इटखेड्याच्या ग्रामसभेत गदारोळ

0
11

अजुर्नी मोर(संतोष रोकडे),दि.२३= तालुक्यातील इसापूर येथील वेद बार व रेस्टारेंट प्रकरणावरून २0 ऑगस्ट रोजी आयोजित ग्रामसभा चांगलीच वादळी ठरली. गेल्या दोन महिन्यापासून वेद बारला मंजुरी दिली नसल्याचे सांगणाड्ढया ग्रापं कमिटीची या सभेत पोलखोल झाली असून ग्रामसभेत ग्रामस्थांनी सदर बार बंद करण्याचा ठराव घेण्यास बाध्य केले.
इसापूर, हनुमाननगर, कन्हाळगाव, घाटी पळसगाव मिळून इसापूर गटग्रामपंचायतीची निर्मिती झाली आहे. या गावांमध्ये कोणत्याही प्रकारचे अवैद्य व्यवसाय नाहीत. मात्र दोन महिन्यापूर्वी इसापूर हद्दीतील गट क्र. २५७, आराजी 0.८४ हेआर जमिनीपैकी राईस मीलसमोरील खुल्या जागे वेद रेस्टारेंट व बार चालू झाले. ही बाब नागरिकांनी ग्रामपंचायत कमिटीच्या लक्षात आणून दिल्यावर अशी कोणतीही परवानगी नसल्याचे सांगून ग्रामस्थांना अंधारात ठेवले होते. परंतु, नव्याने रूजू झालेले ग्रामसेवक पी. टी. गिरीपुंजे यांनी २३ जानेवारी २0१७ ला झालेल्या मासिक सभेतील प्रोसेडींग रजिस्टरमध्ये असलेली वेद हॉटेल व रेस्टारेंटला मंजुरी दिल्याची प्रत २0 ऑगस्ट रोजी आयोजित ग्रामसभेत ठेवल्यावर ग्रामपंचायत कमिटीचे बिग फुटले. त्यामुळे कमिटीच्या आशिवार्दानेच हॉटेल मंजुरीच्या नावाखाली बार चालू करण्याचा घाट घातल्याचा रोष नागरिकांनी व्यक्त करून बार बंद करण्याचा ठराव एकमताने घेतला.
सदर ठरावाची अंमलबजावणी करण्याची कार्यवाही ग्रामपंचायत पार पाडेल, असा ठरावही संमत केला. त्यामुळे ग्रामपंचायत सदर बार बंद करण्यासंदर्भात काय पावले उचलते, याकडे ग्रामवासीयांचे लक्ष लागले आहे.