24.9 C
Gondiā
Sunday, August 2, 2026
Home क्रीडा जिल्हा तायक्वांडो स्पर्धेत मिळवले ११ पदके

जिल्हा तायक्वांडो स्पर्धेत मिळवले ११ पदके

0
23
सालेकसा,दि.२३:- चौहान तायक्वांडो सालेकसा येथील विद्यार्थ्यांनी गोंदिया येथे आयोजित तेराव्या गोंदिया जिल्हा तायक्वांडो स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी बजावली असून ५ सुवर्ण पदक मिळवले तर ६ रजत पदक पटकावले. मास्टर गोल्डी भाटिया ह्यांच्या मार्गदर्शनात तयार झालेल्या सालेकसा तालुक्यातील एकूण २० विद्यार्थ्यांनी ह्या स्पर्धेत भाग घेतला होता त्या पैकी एकूण ११ विद्यार्थ्यांनी विजय संपादित केला आहे. विजयी विद्यार्थ्यांनी त्यांच्या विजयाचे श्रेय त्यांचे मार्गदर्शक गोल्डी भाटिया आणि त्यांच्या पालकांना दिले आहे.
विशेष म्हणजे विजयी ११ विद्यार्थ्यांमध्ये ९ मुली असल्याने संपूर्ण तालुक्यात मुलींमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झालेले आहे.
विजयी विद्यार्थ्यांमध्ये सुवर्णपदक विजेते विद्या नागपुरे,आदिती वरखडे, इशिका हेमने,साक्षी शिवणकर,संगीता गावराने.रजत पदक विजेते आशु रोकडे,कैलास कापसे, तुलसी राणे
,वैष्णवी वलथरे, भावेश ठाकरे , मंगला गौतम यांचा समावेश आहे.