26.1 C
Gondiā
Saturday, August 1, 2026
Home विदर्भ रिसोड नगरपरिषद प्रभाग आरक्षण निश्चितीसाठी प्राधिकृत अधिकारी नियुक्त

रिसोड नगरपरिषद प्रभाग आरक्षण निश्चितीसाठी प्राधिकृत अधिकारी नियुक्त

0
25
  • दि. ३१ ऑगस्ट रोजी होणार आरक्षण सोडत

वाशिम, दि. २८ : जिल्ह्यातील रिसोड नगरपरिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीकरिता प्रभागांचे आरक्षण निश्चित करण्यासाठी शुक्रवार, दि. ३१ ऑगस्ट २०१८ रोजी सकाळी ११ वाजता रिसोड नगरपरिषद सभागृहात आरक्षण सोडत होणार आहे. या आरक्षण सोडतीमध्ये अनुसूचित जातीच्या महिला, अनुसूचित जमाती महिला, नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिला व सर्वसाधारण प्रवर्गातील महिला यासाठी आरक्षण निश्चित करण्यात येईल. या सोडतीकारिता प्राधिकृत अधिकारी म्हणून वाशिम उपविभागीय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.