26.6 C
Gondiā
Saturday, August 8, 2026
Home विदर्भ ओबीसी संघर्ष कृती समितीची तालुका कार्यकारिणी गठित

ओबीसी संघर्ष कृती समितीची तालुका कार्यकारिणी गठित

0
28

सडक अर्जुनी,दि.१५: येथील इंदिरा गांधी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत घेण्यात आलेल्या ओबीसी संघर्ष कृती समितीच्या बैठकित सडक अर्जुनी तालुका संघर्ष समितीची कार्यकारीणीचे सर्वसमंतीने गठण करण्यात आले.तालुका अध्यक्षपदी दिनेश हुकरे यांची निवड करण्यात आली. तर कार्यकारिणीमध्ये कार्याध्यक्ष उमराव गहाणे,मधुसूदन दोनोडे, मोहन सुरसाऊत,जिल्हा उपाध्यक्षपदी विलास चव्हाण,जिल्हा सचिवपदी अशोक लंजे यांना स्थान देण्यात आले आहेत. तर महिला समितीच्या तालुका अध्यक्षपदी किरण हट्टवार यांची निवड करण्यात आली. ही सभा जिल्हा महासचिव मनोज मेंढे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. सभेला कार्याध्यक्ष अमर वराडे,संजय टेंभरे, पी.जी.कटरे, ओबीसी महिला जिल्हाध्यक्ष पुष्पा खोटेले, सडक अर्जुनीचे नगराध्यक्ष देवचंद तरोणे, पं.स.समिती सभापती गिरधारी हत्तीमारे, उपसभापती राजेश कठाणे, माजी सभापती अशोक लंजे, माजी पं.स.सभापती विलास शिवणकर, अनिल मुनेश्वर, सरपंच हेमराज खोटेले, सरपंच गायत्री इरले,भुमेश्वर चव्हाण,हरीष कोहोळे, तुकाराम राणे,गौरव ब्राम्हणकर, शिक्षक चौधरी व बहुसंख्य ओबीसी समाजबांधव उपस्थित होते. सभेचे संचालन दिनेश हुकरे यांनी तर आभार मनोज मेंढे यांनी मानले.