28.2 C
Gondiā
Wednesday, August 12, 2026
Home गुन्हेवार्ता मोहफुलाची दारू तयार करणाऱ्या ३ जणांना अटक

मोहफुलाची दारू तयार करणाऱ्या ३ जणांना अटक

0
20
जिल्हा पोलीस अधीक्षकांव्दारे अवैध व्यवसायांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे. या पथकाला गोंदियाजवळील पांगळी जलाशयाच्या जंगलात अवैधरित्या मोहफुलाची दारू तयार करण्यात येत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीद्वारे पोलिसांनी आज कारवाई करत ३ जणांना रंगेहात पकडले. देवेंद्र नेवारे, खुमेज नेवारे आणि नीलकंठ नाईक अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. यांच्याविरोधात गंगाझरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.