26.6 C
Gondiā
Wednesday, August 12, 2026
Home गुन्हेवार्ता टिप्परची दुचाकीला धडक; दोन ठार, एक जखमी

टिप्परची दुचाकीला धडक; दोन ठार, एक जखमी

0
33
पिंटु हनवते (रा. परसवाडा) आणि श्यामराज ठाकुर (रा. मुंडीपार खुर्द) असे मृतांची नावे आहेत. मनोज बिसेन हा गंभीर जखमी आहे. पिंटू हनवते आणि मनोज बिसेन दोघेही सासऱ्याच्या पुण्यतिथी निमित्त मुंडीपार खुर्द येथे गेले होते. आज सकाळच्या सुमारास चुलत सासऱ्यासोबत दोघेही दुचाकीने शेताकडे जात होते. दरम्यान, विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव टिप्परने दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये दोघे जागीच ठार झाले तर एक गंभीर जखमी आहे. जखमीला गोंदिया येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तर दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे.