24.3 C
Gondiā
Saturday, August 15, 2026
Home विदर्भ शालेय विद्यार्थी, सेवा मंडळ सदस्यांसह युवकांनी केले श्रमदान

शालेय विद्यार्थी, सेवा मंडळ सदस्यांसह युवकांनी केले श्रमदान

0
62

गोरेगाव,दि.25ः-तालुक्यातील सटवा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,ग्रामपंचायत व गुरुदेव सेवा मंडळाच्यावतीने स्वच्छता ही सेवा अभियान अंतर्गत आज 25 सप्टेंबर रोजी महाश्रमदान दिनानिमित्त शालेय विद्यार्थी, सेवा मंडळ सदस्यांसह युवकांनी श्रमदान करून स्वच्छता उपक्रम राबविले.सुरुवातीला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व गाडगेबाबा यांच्या तैलचित्राला माल्यार्पण करून स्वच्छता दिंडी काढण्यात आली. यावेळी गावातील गुरुदेव सेवा मंडळाचे सदस्य, शालेय विद्यार्थी, महिला मंडळाचे सदस्य, तंटामुक्त समितीचे सदस्य, ग्रामपंचायती चे पदाधिकारी, युवक मंडळाचे सदस्य यांच्यासह गावातील नागरिकांनी सहभाग नोंदविला.