28.9 C
Gondiā
Saturday, August 8, 2026
Home शैक्षणिक शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावू- आ.विलासराव जगताप

शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावू- आ.विलासराव जगताप

0
30

(राजेभक्षर जमादार),जत,दि.13ः- जत तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नासाठी आमदार विलासरावजी जगताप यांची जत शिक्षक भारती शिष्टमंडळाने भेट घेऊन शिक्षकांच्या प्रश्नांवर चर्चा केली. यामध्ये तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी,केंद्रप्रमुख, तीन लिपिक आदी रिक्त असणारी पदे तात्काळ भरून शिक्षण विभागास न्याय देण्याची मागणी करण्यात आली. त्याचबरोबर शिक्षकांची सेवापुस्तके अध्यावत करण्यासाठी केंद्रस्तरीय कॅम्प लावून विविध प्रकारच्या नोंदी सेवापुस्तकात करण्यात याव्यात.शिक्षकांची अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारी मेडिकल ,पगार फरक ,वरिष्ठ वेतन श्रेणी फरक ,प्रसूती रजा फरक इ विविध प्रकारची बिल लवकर मिळावेत शिक्षकांच्या सर्व प्रश्नांची सोडवणूक करून ते मार्गी लावू असे आमदार विलासराव जगताप यांनी सांगितले.यावेळी शिक्षक भारती चे अध्यक्ष दिगंबर सावंत,शौकत नदाफ,अविनाश सुतार,मल्लय्या नांदगाव,बाळासाहेब सोलनकर,सुभाष मासाळ, दयानंद रजपूत ,विनोद कांबळे इ पदाधिकारी उपस्थित होते.