आपत्ती निवारणासाठी जनजागृती महत्त्वाचे माध्यम – जिल्हाधिकारी डॉ. बलकवडे

0
13

गोंदिया,दि.13ः- आपत्तीची तीव्रता कमी करण्यासाठी जनजागृती महत्त्वाचा माध्यम आहे. आपत्तीच्या वेळेस दक्षता घेऊन आपत्तीवर मात करणारी उपाययोजना म्हणजेच आपत्ती व्यवस्थापन असे मनोगत जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी आपत्ती निवारण आठवडानिमित्त तयार करण्यात आलेल्या चित्ररथाला हिरवी झेंडी दाखवून व्यक्त केले.यावेळी उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर, रविंद्र राठोड, शिल्पा सोनोळे,तहसिलदार कल्याणकुमार डहाट यांच्यासह सर्व तहसिलदार व इतर अधिकारी उपस्थित होते.
पुढे ते म्हणाल्या की आपत्ती केव्हा ही येऊ शकते. परंतु जनजागृतीमुळे आपत्तीच्या वेळेस उपलब्ध घरगुती साहित्यांचा वापर करुन जिवीत व वित्तीय हानी कमी केली जाऊ शकते. म्हणून विद्यार्थ्यांना शाळेत आपत्तीचे व्यवस्थापनाचे धडे शिकवणे गरजेचे आहे. भुकंप, पूर, आग, वीज, चक्रीय वादळ आदि प्रकारच्या आपत्तींना तोंड देण्याकरिता जिल्हा प्रशासन सज्ज असल्याची माहिती त्यांनी अपत्ती निवारण दिनानिमीत्त आयोजित प्रेस चर्चा दरम्यान दिली. तसेच शासन निर्णयानुसार ९ ते १३ ऑक्टोबरदरम्यान चित्ररथ, पथनाटय, कलापथाकाच्या माध्यमातून जनजागृती केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. आपत्ती निवारण सप्ताहची सुरुवात जिल्हयात तालुकानिहाय प्रभातफेरी काढून करण्यात आली . तथा विविध ठिकाणरी रंगीत तालिम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल आहे. तसेच सदर जनजागृती मोहिमेचा लाभ प्रत्येक नागरिकांनी घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.