30.6 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home शैक्षणिक शेठ र.वि. गोसलिया ज्युनिअर कॉलेज ऑफ एज्युकेशन मिरज येथे माजी विद्यार्थी मेळावाचे...

शेठ र.वि. गोसलिया ज्युनिअर कॉलेज ऑफ एज्युकेशन मिरज येथे माजी विद्यार्थी मेळावाचे आयोजन

0
45

सांगली,दि.17ः- श्री अंबाबाई तालीम संस्थेच्या शेट रतिलाल विठ्ठलदास गोसलिया ज्युनिअर कॉलेज ऑफ एज्युकेशन मिरज जि सांगली येथे रविवार 18 नोव्हेंबरला माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. अध्यापक विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी नोंदणी फॉर्म भरण्याचे काम सुरू आहे.विद्यार्थ्यांनी अध्यापक विद्यालयाची खालील दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन माजी विद्यार्थी संघाने केले आहे.तसेच या निमित्ताने एका स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात येणार आहे . या स्मरणिकेसाठी अध्यापक विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी आपण कसे घडलो अध्यापक विद्यालयातील आलेले अनुभव तसेच स्वंररचित कविता गोष्टी इत्यादी अशा प्रकारचे लेख अध्यापक विद्यालयात प्रत्यक्षात अथवा ई-मेल फोटो पाठवावे जेणेकरून एक चांगल्या स्मरणिकेचे प्रकाशन करता येईल असेही आयोजकांनी म्हटले आहे.अध्यापक विद्यालयाच्या स्थापनेपासूनच्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपली नोंदणी करावी व आपले लेख अध्यापक विद्यालय जमा करावे असे आवाहन माजी विद्यार्थी संघाने व प्राचार्य गौतम शिंगे केली आहे.संपर्क कार्यालय ०२३३/२२११५२९,प्राचार्य जी.टी. शिंगे ९९२२६२९८८४ [email protected]