25.3 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ सिरोंचा पंसचे बिडीओ खिराडे यांचे हृदयविकाराने निधन

सिरोंचा पंसचे बिडीओ खिराडे यांचे हृदयविकाराने निधन

0
34

सिरोंचा,दि.१८::. गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी साहेबराव किसनराव खिराडे(वय 55) यांचे आज हृद्यविकाराच्या झटक्याने उपचारादरम्यान निधन झाले.खिराडे यांना सकाळी हृद्यविकाराचा झटका येताच ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.दरम्यान त्यांच्यावर  उपचार सुरु असतानाच निधन झाले.हे वृत्त कळताच उपविभागीय पोलीस अधिकारी राकेशकुमार जाधव, तहसिलदार रमेश जसवंत, पोलिस उपनिरिक्षक पंतगराव पाटील,आनंद टेकाम यांच्यासह विस्तार अधिकारी,ग्रामसेवक आणि शिक्षण विभागाचे अधिकारी यांनी रुग्णालयात धाव घेतली.खिराडे हे मुळचे नांदेड जिल्हयातील असून त्यांच्या मागे पत्नी,मुलगा व मुलगी असा आप्त परिवार आहे.