25.7 C
Gondiā
Tuesday, August 4, 2026
Home विदर्भ आधारभूत धान खरेदी हंगाम २०१८-१९ धान खरेदी केंद्राबाबत मार्गदर्शक सूचना

आधारभूत धान खरेदी हंगाम २०१८-१९ धान खरेदी केंद्राबाबत मार्गदर्शक सूचना

0
73

गोंदिया,,दि.३१ : आधारभूत धान खरेदी हंगाम २०१८-१९ अंतर्गत जिल्ह्यातील गोंदिया, टेमनी, गिरोला, कटंगीकला, रतनारा, दासगाव, काटी, अदासी, कामठा, नवेगाव/धापेवाडा, रावणवाडी, मजितपूर, कोचेवाही, आसोली, गोरेगाव, कालीमाटी (गोरेगाव), तिमेझरी, गणखैरा, कुऱ्हाडी, चोपा, तेढा, दवडीपार, कवलेवाडा, मोहगाव/तिल्ली, चिरेखनी, पांजरा, वडेगाव, नवेझरी, विहीरगाव, बघोली, भिवापूर, ठाणेगाव, तिरोडा, मुंडीकोटा, चिखली, मेंढा, आमगाव, गोरठा, कालीमाटी (आमगाव), कोटजांभोरा, सालेकसा, पांढरी, सौंदड, मुरपार, बाम्हणी, हेटी, धानोरी, अर्जुनी/मोर(वि.का.), अर्जुनी/मोर(रा.मि.), अर्जुनी/मोर(ख.वि.), नवेगावबांध, महागाव, बोंडगाव देवी, वडेगाव स्टेशन, बाकटी, धाबेटेकडी, भिवखिडकी या ५७ धान खरेदी केंद्र सुरु करण्याकरीता जिल्हाधिकारी गोंदिया यांनी मंजूरी दिली आहे.
जिल्हा पणन अधिकारी गोंदिया कार्यालयाकडून जिल्ह्यातील विविध सहकारी संस्थांना ७ दिवसाच्या आत धान खरेदी केंद्र सुरु करण्याकरीता निर्देश दिले असून शेतकऱ्यांकरीता मार्गदर्शक सूचना निर्गमीत केलेल्या आहेत. त्यानुसार धान खरेदी करतेवेळी शेतकऱ्यांनी त्या हंगामाचा पिकपेरा असलेला ७/१२ चा उतारा मुळप्रत (त्यावर धानाखाली लागवड क्षेत्रफळ नमूमद आहे असा), आधारकार्ड झेरॉक्स व बँक खाते पासबुक झेरॉक्स घेवून धान खरेदी केंद्रावर आणावे. शेतकऱ्यांनी आपले बँक खाते नोंदवितांना आधारलिंक असलेले, घधउ पूर्ण झाले असलेले खात्यामध्ये देवाण-घेवाण सुरु असलेले बँकेचे खातेनंबर दयावे. शेतकऱ्यांनी धानाचे वजन काटे करतेवेळेस स्वत: ओळखपत्र घेवून हजर राहावे. धान मोजल्यानंतर वजन पोहोच पावती प्राप्त करुन घ्यावी. ऋअट दर्जाचे धान खरेदी केल्या जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी धान चाळणी करुन साफसफाई करुन तसेच वाळलेले धान केंद्रावर विक्रीस आणावा. शेतकऱ्यांनी धान चांगले भरलेले, विक्रीय योग्य, सुकलेले/कोरडे (आद्रता विरहीत) स्वच्छ व अन्न म्हणून खाण्यास उपयुक्त असेल असे धान खरेदी केले जाईल. तसेच खरेदी केलेले धान हे बुरशी, किड व अनिष्ठ स्वरुपाचा गंध विरहीत असावे. केंद्रावर येणारा धान अपाय हानीकारक वस्तुचे, पदार्थाचे मिश्रण भेसळ असणार नाही याची दक्षता घ्यावी. सर्वप्रथम शेतकऱ्यांनी आपले गाव ज्या खरेदी केंद्राला जोडलेले आहे त्या केंद्रावर ऑनलाईन शेतकरी नोंदणी करावी. शेतकऱ्यांनी आपला धान नंबर प्रमाणे विक्रीस आणावा. त्याकरीता प्रथम केंद्रावर आपले नाव/मोबाईल नंबर/अंदाजे वजन यांची नोंद घ्यावी.
हंगाम २०१८-१९ करीता शासनाने आधारभूत दर ‘अङ्क प्रत धानासाठी प्रती क्विंटल रु.१७७०/- व ‘साधारणङ्क प्रत धानासाठी प्रती क्विंटल रु.१७५०/- हे दर निश्चित केले असून धान खरेदीचा कालावधी १ ऑक्टोंबर २०१८ ते ३१ मार्च २०१९ पर्यंत आहे. तरी शेतकऱ्यांनी सदर योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे जिल्हा पणन अधिकारी गोंदिया यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.