भंडारा,दि.31ः- जनहीत सामाजिक सेवाभावी संस्था भंडाराच्या वितीने दि. ८ नोव्हेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता मौजा कुंभली (धर्मापुरी) ता. साकोली येथे स्व. डॉ. बाबुराव सोमाजी फुंडे यांच्या जयंती प्रित्यार्थ ग्राम कुंभली (धर्मापुरी) येथील श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दाकाळ निवृत्त वेतन योजना व संजय गांधी अनुदान योजनांच्या लाभार्थ्यांना नि:शुल्क ब्लॅकेटचे वितरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार तथा संस्थापक अध्यक्ष आनंदराव वंजारी यांची उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन खा. मधूकर कुकडे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी खा. तथा राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय काँग्रेस शेतकरी, शेतमजूर संघटनाचे नाना पटोले यांची उपस्थिती लाभणार आहे. विशेष अतिथी म्हणून जि.प. अध्यक्ष रमेश डोंगरे , जि.प.सदस्य होमराज कापगते, जि.प. सदस्य आकश कोरे, ग्रा.पं. कुंभली सरपंच सौ. कमलाबाई भेंडारकर, जि.प.सदस्य उमेध गोडसे, पं.स.सदस्य लखन बर्वे आदींची उपस्थिती राहणार असून या कार्यक्रमाला जास्तीत जास्त लाभांर्थ्यांनी सहभाग घेवून योजनांचा फायदा घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.





