24.2 C
Gondiā
Sunday, August 9, 2026
Home गुन्हेवार्ता हळदीच्या व्यवहारात शेतकऱ्यांना ६ कोटींनी गंडा

हळदीच्या व्यवहारात शेतकऱ्यांना ६ कोटींनी गंडा

0
30

अमरावती,दि.03 – बाजारभावापेक्षा अधिक भाव देण्याची बतावणी करून शेकडो शेतकऱ्यांकडून कोट्यवधी रुपयांची हळद अतुल लव्हाळेने खरेदी केली तसेच परिचित असलेल्या काही श्रीमंत व्यक्तींना गाठून त्यांनाही हळदीच्या व्यवहारात मोठ्या प्रमाणात नफा मिळवून देण्याची बतावणी केली. याचप्रकारे शहरातील एका व्यक्तीकडून तब्बल ७५ लाख रुपये घेतल्याच्या तक्रारीवरून अतुल लव्हाळेविरुद्ध फसवणुुकीचा दाखल होता. या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने लव्हाळेला बुधवारी (दि. ३१) रात्री अटक केली आहे.अतुल साहेबराव लव्हाळे (३६, रा. ढंगारखेडा, वाशीम ह. मु. पन्नालाल नगर, अमरावती) असे पोलिसांनी अटक केलेल्या ठकबाजाचे नाव आहे. अतुल लव्हाळेने मागील दोन ते अडीच वर्षात जिल्ह्यातील विवीध भागातील हळद उत्पादक शेतकऱ्यांना गाठले. बाजारात मिळणाऱ्या भावापेक्षा अधिक भाव हळदीला देतो, अशी शेतकऱ्यांना बतावणी करायची आणि त्यांच्याकडून हळद घेऊन जायची, पैसे काही दिवसानंतर मिळेल, असे आश्वासन शेतकऱ्यांना द्यायचे. काही दिवस शेतकऱ्यांनी त्याला पैसे मागितले नाही मात्र अनेक दिवस उलटूनही लव्हाळेने पैसे दिले नाही. त्याच्यासोबत संपर्कही होत नव्हता आणि जिल्ह्यातील अनेक भागात लव्हाळेने पैसे न देता पेाबारा केल्याची बाब शेतकऱ्यांना माहीती झाली. त्यामुळे शेतकऱ्यांनी पोलिसात तक्रार देण्यासाठी धाव घेतली. त्यामुळेच जिल्ह्यातील समरसपुरा, कुऱ्हा, चांदूर रेल्वे, नांदगाव खंडेश्वर या पोलिस ठाण्यांमध्ये शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अतुल लव्हाळेविरुध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल केला. मात्र लव्हाळे पोलिसांनाही चकमा देवून पसार झाला हाेता.