40.6 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home गुन्हेवार्ता मतिमंद आदिवासी मुलीवर बलात्कार

मतिमंद आदिवासी मुलीवर बलात्कार

0
29

blank

बुलडाणा,दि.10 : संग्रामपुर तालुक्यातील आदिवासी ग्राम वसाळी येथे शुक्रवारी एका आदिवासी अल्पवयीन मतिमंद मुलीवर एका 27 वर्षीय यूवकाने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली.याबाबत सोनाळा पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल करण्यात आली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पीडित मुलीला शेगाव येथे वैद्यकीय चाचणीसाठी पाठवण्यात आले आहे.

मध्यरात्रीनंतर सोनाळा पोलिस स्टेशनला अल्पवयीन मतीमंद पिडीत मुलीचे वडील बालाराम रामचंद्र कोल्हटकर (रा. वसाळी) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी राम भारत पालकर (वय 27, रा. वसाळी) याने शुक्रवारी संध्याकाळी साडेचारच्या दरम्यान पिडीत मुलीच्या घरात घुसून बलात्कार केला. त्या मुलीचे आई वडील व दोन बहिणी शेतात शेती काम करायला गेले होते. हि अल्पवयीन मतीमंद मुलगी घरी एकटी असल्याचे पाहुन या युवकाने तिच्यावर अतीप्रसंग केला. फिर्यादीवरून रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला. असुन आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सोनाळा पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक डि. बी. वाघमोळे, श्याम कपले, गजानन सावंत, व गजानन तायडे करीत आहेत.

blank