29.7 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home Top News पुलगावच्या लष्करी तळावर भीषण स्फोट, 6 जणांचा मृत्यू

पुलगावच्या लष्करी तळावर भीषण स्फोट, 6 जणांचा मृत्यू

0
27

blank

वर्धा,दि.20 – जिल्हयातील पुलगाव परिसरातील लष्करी तळावर भीषण स्फोट झाल्याचे वृत्त समोर आले आहे. देवळी तालुक्यातील सोनगावबाई गावाजवळ बॉम्ब निकामी करण्याच्या ठिकाणी दुर्घटना घडली आहे. पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास बॉम्ब निकामी करताना पेटी हातातून पडल्यामुळे हा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत सहा जण मृत्युमुखी पडल्याच्या बातमीला नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर ११ जण जखमी झाले आहेत. जखमींवर सावंगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या स्फोटाच्या आवाजामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जबलपूर येथील दारुगोळा भांडारातील माल येथे निकामी करण्यासाठी आणले होते. स्फोटके निकामी करण्याचे काम कंत्राटदाराकडून करुन घेतले जाते. त्यांच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडली, अशी माहिती आहे.

मृतांमध्ये प्रभाकर वानखेडे, राजकुमार भोवते, विलास पचारे, नारायण पचारे, सर्व रा. सोनेगाव व प्रवीण मुंजेवार रा. केळापूर यांचा समावेश आहे. विकास बेलसरे, संदीप पचारे, अमित भोवते, रूपराव नेताम, मनोज मोरे, तसेच दिलीप निमगड़े रा. केलापुर हे जखमी आहेत.

आमदार तडस यांनी दिली घटनास्थळाला भेट
आमदार रामदास तडस यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. तसेच दुर्घटनाग्रस्तांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. वर्धा जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय दैने यांनी या अपघाताबाबत तातडीने उपाययोजनेच्या सूचना जारी केल्या आहेत.

 

blank