राज्यस्तरीय शहीद जवान फुटबॉल स्पर्धा गोंदियात; राज्यातील १६ संघ होणार सहभागी

0
9

पत्रपरिषदेत पोलिस अधीक्षकांची माहिती
गोंदिया,दि.२०-जिल्हा पोलिस विभाग व गोंदिया जिल्हा फुटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्तवतीने जिल्ह्यात पहिल्यांदाच राज्यस्तरीय शहीद जवान फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.ही स्पर्धा शहरातील इंदिरा गांधी स्टेडीयम येथे ९ ते १५ डिसेंबर या कालावधीत फ्लडलाईटमध्ये रंगणार आहे.या स्पर्धेत राज्यातील १६ संघ सहभागी होणार असून संपूर्ण आठवडाभर फुटबॉलचा थरार गोंदियाकर अनेक वर्षाच्या प्रतिक्षेनंतर अनुभवणार असल्याची माहिती पोलीस अधिक्षक हरिष बैजल यांनी दिली.सोबतच या फुटबॉल स्पर्धेदरम्यान शालेय विद्याथ्र्यांसह ग्रामीण संस्कृतीचे दर्शन दाखविणारे सांस्कृतीक कार्यक्रमही सादर करण्याची योजना असल्याची माहिती अति.पोलीस अधिक्षक संदिप आटोळे यांनी दिली.
गोंदिया शहर हे एकेकाळी फुटबॉल व हॉकीच्या खेळासाठी चांगले ओळखले जायचे.या शहरातून फुटबॉलमध्ये बंगाल क्लबमध्ये खेळणारेही खेळाडू निघालेले आहेत.तर देशपातळीवर फुटबॉल संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्षपद हे गोंदिया निवासी राज्यसभा खासदार प्रफुल पटेल यांच्याकडे असल्याने या स्पर्धेला अजून महत्व प्राप्त झाले आहे.
कर्तव्यावर असताना शहिद झालेल्या जवानांना अभिवादन करण्यासाठी गोंदिया जिल्हा पोलिस विभागाच्या वतीने गोंदिया जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या सहकायार्ने राज्यस्तराची ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.या स्पर्धेत मुंबई येथून ३ संघ सहभाग घेणार असून पुणेचे २ संघ, औरंगाबाद येथील १, अमरावती २, नागपूर / कामठी येथील ४ तर गोंदियाचे ४ संघ सहभागी होणार आहे. ९ डिसेंबर रोजी नागपूर फुटबॉल अँकेडमी नागपूर व एंजल फुटबॉल अँकेडमी अमरावती यांच्या पहिल्या समान्याने स्पर्धेर्ची सुरुवात होणार असून १५ डिसेंबर रोजी अंतिम लढत राहणार आहे. सदर स्पर्धा नॉक-आऊट पध्दतीने घेण्यात येणार असून सर्व सामने रात्रकालिन राहणार आहेत. त्यात १० वाजतानंतर लाऊडस्पीकर वाजवता येणार नसल्याने सर्व सामने ठराविक वेळेवर घेण्यात येणार असून प्रारंभिक काही दिवस दरदिवशी तीन साखळी सामने घेण्यात येणार आहेत. यात प्रत्येक सामन्यांनतर दहा मिनिटांची विश्रांती दिली जाईल. भाग घेणाèया संघासाठी १००१ रुपये प्रवेश शुल्क ठेवण्यात आले आहे. तर प्रथम पुरस्कार ५१ हजार रुपये, द्वितीय ३१ हजार व तृतिय २१ हजार रुपये पुरस्कार ठेवण्यात आले आहे. त्याच बरोबर चार उत्कृष्ठ खेळाडूंना विशेष पारितोषिक देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे प्रेक्षकांसाठी नि:शुल्क प्रवेश असल्याने या स्पधेर्चे सामने प्रेक्षकांना नि:शुल्क पाहता येणार आहे. तर स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी संपूर्ण राज्यभरातून प्रेक्षक येण्याची शक्यता असल्याने फुटबॉलप्रेमींमध्ये डिसेंबर महिण्यात फुटबॉल फिवर चढणार आहे.