31.8 C
Gondiā
Wednesday, June 17, 2026
Home विदर्भ नरभक्षक वाघाचा तात्काळ बंदोबस्त करा

नरभक्षक वाघाचा तात्काळ बंदोबस्त करा

0
23

कॉम्रेड विनोद झोडगे यांची मागणी

ब्रम्हपुरी,दि.23:–भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ब्रम्हपुरी विधान सभा प्रमुख कॉ विनोद झोडगे यांच्या नेतृत्वात  22 नोव्हेंबरला ब्रम्हपुरी वनविभागाचे उपवनसंरक्षक यांना निवेदन देऊन ब्रम्हपुरी तालुक्यातील दक्षिण वन परिक्षेत्रातील नरभक्षक वाघांचा तात्काळ बंदोबस्त करून वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत पावलेल्या व जखमी झालेल्या कुटुंबियांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी निवेदनातुन केली आहे
यावेळी निवेदन स्वीकारून चर्चा करण्याकरिता मा.बोनगाळे मॅडम ACF,वनविभाग या उपस्थित होत्या. त्यांनी तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले, यावेळी निवेदन देतांना कॉ विनोद झोडगे,कॉ मिलिंद भणारे, कॉ नामदेव नखाते,कॉ कुंदा कोहपरे,चिचगाव व इतर गाव परिसरातील खटू निकोडे,अनिता महाडोरे, विनोद आत्राम,गिरीधर निकोडे,धनलाल दिघोरे,सीताराम प्रधान,रामकृष्ण बूल्ले, प्रभाकर वाढ आधी गावकरी उपस्थित होते.