समृद्धी महामार्गाला दीक्षाभूमी समृद्धी महामार्ग नाव द्या

0
11

भंडारा,दि.23 : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिक्षाभूमी नागपूर येथे दिक्षा घेतली. त्यामुळे समृद्धी महामार्गाला दिक्षाभूमी समृद्धी महामार्ग असे नाव देण्यात यावे, अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम महाराष्ट्र राज्याच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. तसेच निवेदन त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी व अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी विजय भाकरे यांना दिले आहे.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य अलौकीक आहे. १४ आॅक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पवित्र दिक्षाभूमी नागपूर येथे बौद्ध धम्माची दिक्षा घेतली. जगाला स्वातंत्र, समता व बंधुतेचा संदेश दिला. दिक्षाभूमी ते चैत्यभूमी पर्यंत तयार होणाक्तया समृद्धी महामार्गाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला जोडून समृद्धी महामार्गाला दिक्षाभूमी समृद्धी महामार्ग नाव देण्यात यावे, अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम महाराष्ट्र राज्य यांनी केली. शिष्टमंडळात अध्यक्ष जयप्रकाश भवसागर, जिल्हाध्यक्ष राहूल डोंगरे, जिल्हा महासचिव प्रा. रमेश जांगळे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, माजी नगराध्यक्ष महेंद्र गडकरी, अमृत बंसोड, रत्नमाला वैद्य, म.दा. भोवते, महेंद्र वाहाने, किशोर भवसागर, अरुण गोंडाणे, अनमोल लोणारे, डी.व्ही. बारमाटे, सचिव मेश्राम, शेखर भलावी, एम.डब्ल्यू. दहिवले, एन.एच. भोयर, रिता सुखदेवे यांनी केली आहे.