42.4 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home गुन्हेवार्ता बाजार समिती परिसरात युवकाची हत्या?

बाजार समिती परिसरात युवकाची हत्या?

0
16

गोंदिया,दि.0७ःः येथील मुख्य बाजार चौक परिसरात असलेल्या कृषि उत्पन्न बाजार समितीजवळील पाणी टाकीच्या जवळ आज(दि.07) एका युवकाचा मृतदेह आढळून आला असून त्या युवकाची हत्या करण्यात आल्याची शंका व्यक्त केली जात आहे.गोंदिया शहर पोलीसांना घटनेची माहिती होताच त्यांना घटनास्थल गाठूम सदर युवकाचा मृतदेह ताब्यात घेतला आहे.मृतक युवकाचे नाव गौतमनगर निवासी चिराग रमेश शेंडे (२५) असे सांगितले जात आहे.पोलीसांनी सदर मृतदेह शासकीय वैद्यकीत महाविद्यालयात उत्तरीय तपासणीकरीता पाठविले असून मोठ्या वस्तुने डोक्यावर वार करण्यात आले असावे अशा कयास आहे.गोंदिया शहर पोलीस याप्रकरणात तपास करीत आहे.

blank