शोध क्षमतेचा,ग्रामीण ऊर्जेचा स्पर्धा परीक्षा व्याख्यानमाला अंतर्गत चौथे सत्र यशस्वीरित्या संपन्न

0
16

गोंदिया दि.७: जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या संकल्पनेतून जिल्हा प्रशासनाच्या वतीने नाविण्यपूर्ण उपक्रम ‘शोध क्षमतेचा,ग्रामीण ऊर्जेचाङ्क ही स्पर्धा परीक्षा व्याख्यानमाला सुरु करण्यात आलेली आहे. या व्याख्यानमालेअंतर्गत प्रत्येक महिन्यात दर शुक्रवारला तज्ज्ञ वक्ते/अधिकाऱ्यांमार्फत मार्गदर्शन करण्यात येते. त्यानुसार सदर व्याख्यानमालेचे चौथ्या सत्राचे आयोजन ७ डिसेंबर रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, गोंदिया येथे करण्यात आले होते. यावेळी आमगाव नगरपंचायतचे मुख्याधिकारी मनुज जिंदाल, गोंदिया वनपरिक्षेत्र अधिकारी सुशिल नानवटे व श्रीमती स्नेहल म्हसकर, उपायुक्‍त तथा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य देवसुदन धारगावे यांची प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थिती होती.
श्री.जिंदाल यांनी केंद्रीय लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोगाच्या विविध पदांच्या भरतीसंदर्भात परीक्षांच्या स्वरुपाबाबत तसेच परीक्षांच्या तयारीबाबतचे बारकावे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.श्री.नानवटे यांनी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या तसेच शासनाच्या विविध विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांच्या तयारीबाबत मार्गदर्शन केले.
श्रीमती म्हसकर यांनी वन विभागाच्या विविध पदांच्या भरतीसंदर्भात विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तरे देवून त्यांच्या शंकांचे निराकरण केले. श्री.धारगावे यांनी विद्यार्थ्यांशी चर्चेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षासंदर्भातील विस्तृत माहिती दिली.
व्याख्यानमालेचे प्रास्ताविक वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक अंकेश केदार यांनी केले व उपस्थितांचे आभार मानले. व्याख्यानमालेत जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा व्याख्यानमालेचा पुढील सत्राचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.