26.9 C
Gondiā
Thursday, August 13, 2026
Home क्रीडा नागपूर अकादमीने केला अमरावती एंजलचा 6-2 ने पराभव

नागपूर अकादमीने केला अमरावती एंजलचा 6-2 ने पराभव

0
33
गोंदिया,दि.०९- जिल्हा पोलीस विभाग व गोंदीया जिल्हा फुटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विदयमाने आज रविवार ९ डिसेंबरला ‘राज्य स्तरीय शहीद जवान फुटबॉल स्पर्धा – २०१८ चे इंदिरा गांधी स्टेडीयम येथे थाटात उदघाटन करण्यात आले.फ्लड लाईटच्या उजेडामध्ये आयोजित फुटबॉलच्या पहिल्या सामन्यात नागपूर फुटबॉल अकादमी नागपूर संघाने एंजल फुटबॉल अकादमी अमरावतीचा पराभव केला.
नागपुर फुटबॉल अ‍ॅकेडमी नागपुर विरुध्द एंजल फुटबॉल अ‍ॅकडमी अमरावती यांचे मध्ये रंगतदार लढत पाहण्यास मिळाली. नागपुर फुटबॉल ॲकॅडमी नागपुर संघांने एंजल फुटबॉल ॲकॅडमी अमरावती संघांला ६-२ अशा फरकाने  पराभुत केले. या सामन्यादरम्यान  नागपुर फुटबॉल ॲकॅडमी नागपुर संघाकडुन शोरब अंसारी या खेळाडुने तीन गोल करत हॅट्रीक केली तर सादाब अख्तर या खेळाडुने दोन गोल व रोहीत कनोजिया याने एक गोल केला. तर एंजल फुटबॉल ॲकॅडमी अमरावती संघांकडुन अनास सय्यद व नयन कनोजिया यांनी प्रत्येकी एक एक गोल केले. सदर सामन्यानंतर लोहीया हायस्कुल सौदड शाळेच्या विदयार्थ्यांनी सर्वधर्म सहभाव गाण्यावर नृत्यांचा कार्यक्रम सादर केला.
आजचे सामने १० डिसेंबर
इंदिराणी स्पोर्टस पुणे विरुध्द राहुल फुटबॉल क्लब नागपूर
युनियन बॅक ऑफ इंडिया मुंबई विरुध्द उत्कल फुटबॉल क्लब गोंदिया
यंग मुस्लीम फुटबॉल क्लब नागपूर विरुध्द डब्लींग फुटबॉल क्लब गोंदिया
blank