फुटबॉल स्पर्धेकरीता पाहिजे ते सहकार्य लोकप्रतिनिधी करणार-आ.अग्रवाल

0
19
राज्यस्तरीय शहीद जवान फुटबॉल स्पर्धेचे थाटात उदघाटन
गोंदीया,दि.०९- जिल्हा पोलीस विभाग व गोंदीया जिल्हा फुटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विदयमाने आज रविवार ९ डिसेंबरला ‘राज्य स्तरीय शहीद जवान फुटबॉल स्पर्धा – २०१८ चे इंदिरा गांधी स्टेडीयम येथे थाटात उदघाटन करण्यात आले.फ्लड लाईटच्या उजेडामध्ये आयोजित फुटबॉलच्या पहिल्या सामन्यात नागपूर फुटबॉल अकादमी नागपूर संघाने एंजल फुटबॉल अकादमी अमरावतीचा पराभव केला.
काही वर्षानंतर पहिल्यांदाच होत असलेल्या गोंदियातील राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेचे उदघाटन लोकलेखा समितीचे अध्यक्ष व गोंदियाचे आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी भंडारा-गोंदियाचे खासदार मधुकर कुकडे,जिल्हा परिषद अध्यक्षा सीमा मडावी,आमदार डॉ.परिणय फुके,जिल्हा पोलीस अधिक्षक हरिष बैजल,जिल्हा क्रिडा अधिकारी सुभाष गांगरेड्डीवार,बिरसी विमानतळाचे व्यवस्थापक खंगार ,गोंदिया जिल्हा फुटबॉल क्लबचे सचिव खुर्शीद अंसारी,श्रीमती छाया बैजल,प्रा.ललित जिवानी यांच्यासह पोलीस अधिकारी मंचावर उपस्थित होते.
फुटबॉल स्पर्धेचे उदघाटन करतांना आमदार गोपालदास अग्रवाल म्हणाले की गेल्या अनेक वर्षापासून या स्टेडीयममध्ये अशी स्पर्धा व्हावी ही आपली इच्छा होती.गेल्या दोन ते तीन दशकापुर्वी होणाèया स्पर्धा खेळाडूंना न्याय देणाèया ठरल्या होत्या.त्या पुन्हा पोलीस विभागाच्या माध्यमातू साकार होणार असून राज्यस्तरीयच नव्हे तर राष्ट्रीय पातळीवरील फुटबॉल स्पर्धा आयोजित करा लोकप्रतिनिधी म्हणून जेवढे सहकार्य लागेल ते सर्व काही देण्यास तयार असल्याची ग्वाही दिली.पोलीस अधिक्षक बैजल यांनी नवनवे उपक्रम सुरु केले ते जनतेच्या हिताचेच आहेत त्याचे समर्थन नक्कीच करावे लागणार आहे.पंरतु पोलीसांनी हे कार्य करतांना जनतेशी संवाद हा सुसंवाद असायला पाहिजे याकडेही लक्ष देण्याची गरज आहे.जनतेशी सौहार्दपुर्ण संवादावर भर दिल्यास पोलीसांची प्रतीमा चांगली निर्माण होऊ शकते जेव्हा की पोलीसांची वागणूकीत गैरवर्तणुक व आंतक असला तर भ्रष्टाचार वाढतो त्यामुळे आतंक नको तर सौर्हाद कसे टिकविता येईल याकडेही लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगत स्पर्धेला शुभेच्छा दिल्या.
यावेळी भंडारा-गोंदिया मतदारसंघाचे खासदार मधुकर कुकडे यांनी नक्षलग्रस्त भागात पोलीस काम करीत असतांना त्यांना अनेक समस्यांना सामना करावा लागतो अशा परिस्थितीत पोलीस व जनतेचा संबध अशा अनेक स्पर्धांच्या माध्यमातून बळकट झाल्यास पोलीसांचे आत्मबळ वाढिस मदत होईल.सोबतच या स्पर्धेसारखीच स्पर्धा पुढच्यावर्षीपासून गोंदियात राष्ट्रीय फुटबाँल अकादमीच्या माध्यमातून घेण्याचे आश्वासन प्रफुल पटेल यांनी दिल्याचे सांगितले.तर आमदार डॉ.परिणय फुके यांनी या फुटबॉल स्पर्धेमुळे गोंदियाला पुन्हा नावलौकीक मिळणार असून शहिद पोलीसांच्या कार्याला सलाम करण्यासाठी असलेल्या यास्पर्धेतून पोलीसांसोबतच खेळांडूनाही एक सन्मान मिळणार असल्याचे म्हणाले.सोबतच राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सर्व सहकार्य करु असे आश्वासन देत नोकरभरतीत खेळांडूना प्राधान्य देण्यासबंधी प्रशासकीय स्तरावर विचार करण्याची सुचना केली.प्रास्तविकात पोलीस अधिक्षक हरिष बैजल यांनी फुटबॉलमुळे गोंदियाची एक वेगळी ओळख आहे,ती ओळख टिकवून ठेवण्यासाठी पहिल्यांदा राज्यस्तरीय स्पर्धेतून केलेली सुरवात असून पुढच्यावर्षी राष्ट्रीय स्तरावरील फुटबॉल स्पर्धो घेण्याची तयार असल्याचे सांगत या स्पर्धेला व खेळाला राजाश्रयाची गरज असल्याचे सांगितले.सोबतच युवकांनी गुन्हेगारीकडे वळण्यापेक्षा खेळाकडे वळल्यास संधी उपल्बध होतील असेही सांगितले.संचालन मंजुश्री देशपांडे यांनी केले.उदघाटन सोहळ्यानंतर पहिल्या सामन्यातील खेळाडूची ओळख पाहुण्यांशी करुन देण्यात आली.त्यानंतर राष्ट्रगिताने कार्यक्रमाची सांगता झाली.कार्यक्रमाचे आभार उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांनी मानले.तर सामन्याचे समालोचन शिव नागपूरे व राजेश शेंद्रे यांनी केले.यावेळी शालेय विद्याथ्र्यांचे मनोरंजनपर कार्यक्रमही सादर करण्यात आले.
भुवनेशचा सत्कार
उदघाटन दरम्यार्न अंडर १७ फुटबॉलच्या भारतीय संघांतील खेळाडु पोलीस बॉय भुवनेश शेंद्रे याचा त्याने चीन, जॉर्डन, मलेशीया व थायलंड इत्यादी देशांमध्ये आशीयायी फुटबॉल चॅम्पीयनशीप दरम्यान केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबाबत मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.