24.6 C
Gondiā
Friday, August 14, 2026
Home विदर्भ बिबट्याच्या हल्ल्यात भन्तेजी ठार

बिबट्याच्या हल्ल्यात भन्तेजी ठार

0
40

चंद्रपूर,दि.11: चिमूर तालुक्यातील रामदेगीनजिकच्या डोंगरावर असलेल्या संघरामगिरी या ठिकाणच्या विहार परिसरात ध्यानस्थ बसलेल्या भन्ते राहुल यांच्यावर आज मंगळवारला सकाळच्या सुमारास बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली.भन्ते राहुल हे  चिमूर तालुक्यातील वन परिक्षेत्र बफर खडसंगी अंतर्गत येणाºया बौद्धधर्मियांचे श्रद्धा स्थान असलेल्या संघराम गिरी येथे साधना करीत असताना अचानक बिबट्याने हल्ला करून भन्ते राहुल बोधी याना ठार मारल्याची घटना आज सकाळी ११ वाजता दरम्यान ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोन कंपार्टमेंट क्रमांक ६० च्या हद्दीत घडली. सोबत अधिष्ठान करीत असलेल्या भन्तेला ही घटना दिसताच त्यांनी आरडा ओरड केली. मात्र तोपर्यंत बिबट्याने आपला डाव साधला होता.घटनेची माहिती मिळताच खडसंगी बफर झोनचे वन अधिकारी दुर्गेकार आपल्या सहकाºयांसह घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा केला आहे.

blank