24.3 C
Gondiā
Thursday, August 13, 2026
Home विदर्भ शेकापच्या मौशीखांब-मुरमाडी सर्कलची कार्यकारिणी जाहीर

शेकापच्या मौशीखांब-मुरमाडी सर्कलची कार्यकारिणी जाहीर

0
40

गडचिरोली,दि.13ः- तालुक्यातील अमीर्झा येथील दत्त मंदिरात नुकतेच मौशीखांब-मुरमाडी सर्कल मधील गावातील शेतकरी कामगार पक्षाच्या आयोजित कार्यकर्त्यांच्या सभेला शेकापचे जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते, महिला नेत्या जयश्री वेळदा, जिल्हा सहचिटणीस भक्तदास कोठारे,सोमाजी करकाडे,पुरोगामी महिला संघटनेच्या जिल्हा चिटणीस अर्चना चुधरी, ओबीसी जागृती अभियानाचे समन्वयक दिनेश बोरकुटे,गडचिरोली विधानसभा चिटणीस नरेश मेश्राम, आरमोरी विधानसभा चिटणीस रोहिदास कुमरे,तालुका चिटणीस भाई सुधाकर आभारे प्रामुख्याने उपस्थित होते.या बैठकीत शेतकरी कामगार पक्षाच्या सर्कल व एरिया समीती पदाधिकाऱ्यांची एकमताने निवड करण्यात आली.त्यामध्ये मौशीखांब-मुरमाडी सर्कल चिटणीस रोशन नरुले(भिकारमौशी),खजिनदार-पुरूषोत्तम जुवारे(बेलगाव),सहचिटणीस-अमीन पठाण(अमीर्झा),विकास खोब्रागडे(गिलगाव),देविदास आत्राम(आंबेशिवणी) सदस्य- नागोराव नंदेश्वर(कळमटोला),संजय भैसारे(मौशीखांब),शंकर भुरसे(बेलगाव),चंद्रशेखर आत्राम(मरेगाव),विलास ठाकरे(चांभार्डा),सुधाकर गेडाम(रानखेडा),जीवन मेश्राम(आंबेटोला),चंद्रकांत नरुले(भिकारमौशी),राहुल मडावी(मुरुमबोडी),अनिल कुमरे(बोथोडा),सत्यवान कोहपरे(मौशीचक),पंकज ठाकरे(कातखेडा),फाल्गुन समर्थ(टेंभा)यांची नियुक्ती करण्यात आली.
तर मरेगाव-मुरमाडी एरिया समीतीच्या चिटणीस पदी मनोहर भोयर(मुरमाडी) यांची तर तुषार बोरकर(गिलगाव)यांची खजिनदार ,सदस्यपदी खुशाल मुरतेली(कळमटोला),अतुल राऊत(आंबेटोला),पंढरी गुरनूले(भिकारमौशी),किशोर वेलादी(मरेगाव),विलास उसेंडी(मुरुमबोडी),मनेश कुमरे(बोथोडा),विकास सयाम(कातखेडा),पंकज पत्रीवार(मौशीचक) यांची नियुक्ती करण्यात आली.मौशीखांब-टेंभा एरिया समीतीचे चिटणीस म्हणून चंद्रभान कोमलवार(मौशीखांब),खजिनदार-दिवाकर वाघाडे(टेंभा) तर सदस्यपदी धनराज मंटकवार (मौशीखांब),सुरेश पानसे(रानखेडा),चुडाराम समर्थ(टेंभा),दादाजी नैताम(बेलगाव),मनोज सरपे(अमिर्झा),माणिक मेश्राम(चांभार्डा) यांची नियुक्ती करण्यात आली.

blank