28.2 C
Gondiā
Wednesday, August 12, 2026
Home विदर्भ श्री संत गाडगेबाबा पुण्यतिथी महोत्सव २५ डिसेंबरपासून

श्री संत गाडगेबाबा पुण्यतिथी महोत्सव २५ डिसेंबरपासून

0
39
OLYMPUS DIGITAL CAMERA

गोंदिया,दि.14 : श्री संत गाडगेबाबा आणि तुकडोजी महाराज विश्वस्त मंडळ, सूर्याटोलाच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या ६२ व्या पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन २५ व २६ डिसेंबरला करण्यात आले आहे.२५ डिसेंबरला सायंकाळी ५ वाजता प्राणज्योत प्रज्वलन व उद्घाटन सेवानिवृत्त प्राचार्य हरिनारायण चौरसिया यांच्या हस्ते, विजयकुमार जैन यांच्या अध्यक्षतेखाली होईल. अतिथी म्हणून माजी न. प. अध्यक्ष के. बी. चव्हाण उपस्थित राहतील. सायंकाळी ७ वाजता सामुदायिक प्रार्थना, हरिपाठ व नंतर हरिभाऊ झंझोरीकर, चुन्नीलाल घोरमारे, चमरू बिसेन, बिसेन महाराज यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. २६ डिसेंबरला सकाळी ९ वाजता शोभायात्रा, १ वाजता गोपालकाला कीर्तन, दहीहंडी, पूजन, आरती व सायंकाळी ६ वाजेपासून महाप्रसाद वितरण करण्यात येणार आहे. यावेळी अध्यक्षस्थानी विनोद अग्रवाल राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून आमदार डॉ. परिणय फुके, उदयकुमार प्रमर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला जास्तीत जास्त नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष हरिहरभाई पटेल, उपाध्यक्ष विठ्ठलकुमार मुंदडा, कोषाध्यक्ष मूलचंद रहांगडाले, सचिव मुकेश चन्ने, सहसचिव श्रीकांत क्षत्रिय, डॉ. हरिनारायण चौरसिया, डॉ. राधेश्याम अग्रवाल, विजयसिंह बैस, केवलचंद गौतम, माधव रहांगडाले, बुधराम काळे, नवीन कटरे, ताराचंद लांजेवार, शैलेंद्रसिंह चंदेल, राजेंद्र कटरे, सचिन कटारे, बहेकार आदींनी केले आहे. .

blank