25.6 C
Gondiā
Saturday, August 8, 2026
Home Featured News शिक्षक विनोद मोटघरे यांचे मरणोत्तर देहदान

शिक्षक विनोद मोटघरे यांचे मरणोत्तर देहदान

0
39

गोंदिया,दि.19: बुद्धिस्ट समाज संघाचे नियंत्रक संचालक व शिक्षक विनोद घनश्याम मोटघरे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने मंगळवारला सकाळी मार्निंगवाॅकच्या दरम्यान निधन झाले. त्यांच्या निधनानंतर कुटुंबीयांनी त्यांच्या इच्छेनुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला देहदान केले.विनोद मोटघरे हे चिखली येथील शाळेत साहाय्यक शिक्षक पदावर कार्यरत होते. त्यापूर्वी ते संत कबीर शाळेत साहाय्यक शिक्षक पदावर कार्यरत होते. त्यांनी अनेक सामाजिक, धार्मिक संस्थामध्ये कार्य केले. विद्यार्थ्यांसाठी सतत मार्गदर्शक असणारे विनोद मोटघरे यांचे १८ डिसेंबर रोजी निधन झाले. त्यांच्या परिवारात पत्नी, आई व एक मुलगा असून मृत्यूनंतर त्यांच्या इच्छेनुसार पार्थिव शरीर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गोंदिया येथे दान करण्यात आले.उपस्थितांनी अंत्यदर्शन घेतल्यानंतर डॉक्टरांना पार्थिव सोपविण्यात आले. त्यांना मित्रपरिवार आणि संथागार परिवारातर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

blank