अटल विश्वकर्मा योजना मजुरांच्या वैयक्तीक विकासासाठी : विनोद अग्रवाल

0
14

गोंदिया , दि. १९ : समाजाच्या प्रत्येक घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या अनुसंघाने केंद्र व राज्य सरकार कटीबध्द आहे. यासाठी वैयक्तीक लाभाच्या योजना सुरू करण्यात आल्या आहेत. अटल विश्वकर्मा सन्मान योजना मजुरांच्या सन्मानार्थ सुरू करण्यात आली आहे.या योजनेच्या माध्यमातून निश्चित पणे मजुरांच्या सर्वागीन विकासासाठी अनेक उपक्रमांच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य देण्यात येणार असे प्रतिपादन भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष तथा जि.प. माजी उपाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी केले.ते खातिया येथे अटल विश्वकर्मा सन्मान योजना अंतर्गत नोंदणी केलेल्या मजुरांना ओळख पत्र वितरण कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षस्थानावरून  बोलत होते.अग्रवाल पुढे म्हणाले की, मजुरांना रोजगाराव्यतीरिक्त कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी अनेक अडीअडचणी येत असतात. ही बाब लक्षात घेऊन केंद्र सरकाराने अटल विश्वकर्मा योजना सुरू केली आहे. या योजनेत मजुराच्या कुटुंबात येणार्या् आर्थिक अडीअडचणी आरोग्य विषयक अडचणी दुर करण्यासाठी अनेक बाबींचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेच्या माध्यमातून मजूर चिंतामुक्त होणार आहे. योजनेचा लाभ जास्तीत-जास्त मजुरांना मिळावा यासाठी आपण प्रयत्न केले आहे.

अग्रवाल यांच्या हस्ते १०० च्या वर ओळख पत्र वाटप करण्यात आले. यावेळी प्रामुख्याने देवानंद महारवाडे, मुलचंद बाहेकार , सुभाष शिवणकर, गोपीचंद थेर, ललित कावडे , अनंतरामजी तावडे, महेश चौरे, योगराज बाहेकार, पंकज शिवणकर, संतोष शेंडे, सुरेंद्र शेंडे, आनंद शिवणकर, गुरुप्रसाद तावडे, राजेश हत्तीमारे, घनश्याम मटाले , श्रीराम फुंडे , घनश्याम परिहार , ब्रजलाल कुणे, सांप्रत बागडे, हरिचंद हत्तीमारे, मनोज बागडे प्रामुख्याने उपस्थित होते.