26.3 C
Gondiā
Thursday, August 6, 2026
Home Top News रस्ता बांधकामावरील नक्षल्यांनी जेसीबी जाळला

रस्ता बांधकामावरील नक्षल्यांनी जेसीबी जाळला

0
27

गडचिरोली,दि.21 : एटापल्ली तालुक्यातील गट्टा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गट्टागुडा गाव जंगल परिसरात पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या कामावरील एक जेसीबी मशीनला नक्षल्यांनी आज शुक्रवारला(दि.21)दिवसाढवळ्या 2 वाजेच्या सुमारास आग लावल्याची घटना घडली.यात कंत्राटदाराचे सुमारे वीस लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.पंतप्रधान ग्राम सडक योजने अंतर्गत गट्टा ते गट्टागुडा गावपर्यंत दोन किलोमीटर अंतर रस्ता निर्मितीचे काम गडचिरोलीचे लोकेश डोंगरवार नामक कंत्राटदार करीत असून,रस्त्यावर मुरुम घालण्याचे काम सुरु आहे. 50 ते 60 च्या संख्येतील शस्त्रसज्य व गणवेशधारी नक्षल्यांकडून घेराव घालून काम बंद करण्यास सांगण्यात आले. तीष्ण हत्याराने जेसीबी वाहनाची डिझेल ट्रंक फोडून वाहनावर डिझेल टाकून आग लावण्यात आली. यावेळी मजूर, वाहक व चालकांना कोणतेही रस्ता निर्माणकार्य करण्यात येऊ नये, अशी धमकी दिली.