26.9 C
Gondiā
Tuesday, August 11, 2026
Home विदर्भ कवी देवेंद्र चौधरी यांच्या “पणन” कवितासंग्रहाचे प्रकाशन

कवी देवेंद्र चौधरी यांच्या “पणन” कवितासंग्रहाचे प्रकाशन

0
39
तिरोडा,दि.३१ः:-तिरोडा नगरीतील सुप्रसिद्ध कवी व गझलकार देवेन्द्र चौधरी यांचे “पणन”  या कवितासंग्रहाचे आमगाव तालुक्यातील बोरकन्हार येथे आयोजित २६ व्या झाडीबोली साहित्य संमेलनात थाटात प्रकाशन झाले.सुप्रसिद्ध कवी व गझलकार देवेन्द्र चौधरी यांचे “पणन”  या कवितासंग्रहाचे प्रकाशन प्रसंगी संमेलनाध्यक्ष मिलिंद रंगारी, मावळते संमेलनाध्यक्ष बंडोपंत बोरडकर, डॉ. हरीशचंद्र बोरकर, ज्येष्ठ साहित्यिक लखनसिंह कटरे, झाडीबोलीच्या बहिणाबाई अंजनाबाई खुणे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. सदर कवितासंग्रहाला ज्येष्ठ साहित्यिक लखनसिंह कटरे यांची प्रस्तावना लाभली आहे. सदर कविता संग्रहात एकूण 50 कविता असून त्यापैकी काही गझल आहेत तर काही गझलसदृश काव्यरचना आहे. तिरोडा परिसर व त्यांच्या मित्रमंडळींनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
blank