26.9 C
Gondiā
Thursday, August 13, 2026
Home क्रीडा ब्लॉसम पब्लिक स्कुल येथे क्रिडा सत्राचे उदघाटन

ब्लॉसम पब्लिक स्कुल येथे क्रिडा सत्राचे उदघाटन

0
26

देवरी,दि.03ः-ब्लॉसम स्कुल येथे 10 व्या वार्षिक क्रीडा सत्राचे थाटात उदघाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून साझिक मिर्झा (सेवानिवृत्त भारतीय सेना)
प्राचार्य डॉ सुजित टेटे , क्रीडा शिक्षक राहुल मोहुर्ले आणि भोजराज तुरकर मंचावर उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात शाळेचा ध्वजारोहण आणि फीत कापून करण्यात आली.
खेळाचे शालेय जीवनातील महत्व आणि त्यांचे खेळातील योगदान यावर मार्गदर्शन करण्यात आले.प्राचार्य सुजित टेटे यांनी खेळातील विजय आणि पराजय या दोन्ही नाण्याच्या बाजू आहेत त्यामुळे खचू नका पुन्हा प्रयत्न करा यावेळी बोलत होते.आज पासून सुरू झालेल्या क्रीडा सत्रा मध्ये शाळेतील सर्व विदयार्थी सहभागी झाले आहेत.सूत्रसंचालन विश्वप्रीत निकोडे यांनी केले आभार प्रदर्शन नितेश लाडे यांनी मानले.शाळेतील सर्व शिक्षकांनी महत्वाची भूमिका बजावली.

blank