24.6 C
Gondiā
Friday, August 14, 2026
Home शैक्षणिक माकडी येथे केंद्रस्तरीय क्रीडा समेंलनाचे उदघाटन

माकडी येथे केंद्रस्तरीय क्रीडा समेंलनाचे उदघाटन

0
43

गोंदिया,दि.03-ः स्वदेशी खेळोत्तेजक मंडळ जिल्हा परिषद गोंदियाच्या वतीने तालुक्यातील माकडी जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर तीन दिवसीय केंद्रस्तरीय क्रीडा संमेलनाचे उदघाटन जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती रमेश अंबुले यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी अंबुले यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यामध्ये खेळाप्रती आपुलकी निर्माण होऊन शारिरीक कौशल्य विकसीत करण्याचे प्रयत्न करावे असे आवाहन करीत खेळोत्तेजक खेळ हे फक्त आपल्या गोंदिया जिल्ह्यातच खेळविले जातात याचा ुल्लेख केला.तसेच भौतिक सुविधांना महत्त्व न देता विद्यार्थी घडविण्यासाठी महत्त्व देणे गरजेचे असल्याचेही म्हणाले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे उपसभापती चमनभाऊ बिसेन होते.यावेळी जिल्हा परिषद सदस्या विमलताई नागपुरे,सरपंच सौ. त्रिवेणीताई हनवत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

blank