युवकांनो, स्वयंरोजगाराकडे वळा-राजेंद्र जैन

0
9

लाखनी,दि.03ः-कुठल्याही गोष्टीची तयारी प्रामाणिक आणि पूर्ण असली पाहिजे, कुठलीही कार्य सिद्धीस जाण्यासाठी खुप मोठी मेहनत करावी लागते. उद्योग क्षेत्रात देखील यश अपघाताने मिळत नसते तर त्यासाठी कठोर मेहनत, जिद्द, तयारी करण्याची प्रामाणिक मानसिकता असली पाहिजे. आज नोकरीचा प्रश्न प्रचंड गंभीर आहे. अशावेळी युवकांनी स्वयंरोजगाराचा मार्ग स्विकारुन आयुष्य घडवावे असे प्रतिपादन माजी आमदार राजेन्द्र जैन यांनी केले. लाखनी येथे भारतीय युवा बेरोजगार संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या स्वयंरोजगार मेळावा व यंत्रप्रदर्शनीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ही संस्था गेली ४ वर्षे युवकांना प्रोत्साहित करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहे हे कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनीलभाऊ फुंडे यांनी केले. यावेळी मंचावर माजी आमदार सेवकभाऊ वाघाये पाटील, राष्ट्रवादी महीला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा कल्याणी भूरे, विकास गभणे, धनु व्यास, सुधन्वा चेटुले, बालुभाऊ चुन्ने उपस्थित होते.
मेळाव्याला महाविद्यालयीन विद्यार्थी, युवक, बचत गटाच्या महिला उपस्थित होते. युवकांनी शेती व शेतीशी पूरक व्यवसाय करावे आणि स्वताचा, कुटुंबाचा, गावाचा पर्यायाने देशाचा विकास करण्यात हातभार लावावा असा आशावाद अविनाश ब्राम्हणकर यांनी व्यक्त केला. मेळाव्यातस्वयंरोजगार व लघुउद्योगास उपयुक्त विवीध प्रकारची यंत्रे व त्यांची प्रात्यक्षिके देखील दाखवन्यात आली.
प्रास्ताविकाच्या माध्यमातून संस्थेचे अध्यक्ष बालूभाऊ चुन्ने यांनी संस्थेच्या उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे प्रवक्ते राकेश राऊत यांनी तर आभार रजनीकांत खण्डारे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अर्चना ढेंगे, राहुल तवाडे, नीलेश गाढवे, राजू शिवरकर, डिगेश शिवणकर, जीतू शिवरकर, बबन पिलारे, सुभाष दिवटे, शुद्धोदन टेंभुर्ने, अमर नंदेश्वर, हितेश झोडे, शुभम वंजारी यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे संयोजन अविनाश ब्राम्हणकर, धनुभाऊ व्यास, सुधन्वा चेटुले यांनी केले.