40 C
Gondiā
Wednesday, June 17, 2026
Home गुन्हेवार्ता मॅग्नीज चोरीप्रकरणी १२ जणांचा अमानुष छळ

मॅग्नीज चोरीप्रकरणी १२ जणांचा अमानुष छळ

0
36

भंडारा,दि.12ः- मॅग्नीज चोरी करीत असल्याचा आरोपावरून १२ लोकांना अर्धनग्न करून अमानुष छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. जिल्ह्यातील चिखलामाईन या गावात ही घटना घडली. यासंदर्भातील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हे सत्य समोर आले आहे.
भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात ‘मॅग्नीज इंडिया लिमिटेड’च्या चिखलामाईन आणि डोंगरी बुजुर्ग या ठिकाणी खाणी आहेत. याठिकाणी चोरीचे प्रकार नेहमीच घडत असतात. मात्र, याबाबत पोलिसांत कुठलीही तक्रार न देता १२ लोकांना चक्क अर्धनग्न करून शिक्षा देण्यात आल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.
येथील सुरक्षारक्षकांनी स्वत:च ही शिक्षा दिल्याचे मॉईलच्या कार्यालयासमोर हा प्रकार घडलेला असल्याचे चित्र व्हायरल झालेल्या व्हिडीओ चित्रफितीमध्ये दिसून येत आहे. शिक्षा देत असलेल्या लोकांवरही चोरी करीत असल्याचे आरोप आहेत. मात्र, या सुरक्षा रक्षकांना अशा अमानवी पद्धतीने शिक्षा देण्याचे अधिकार कोणी दिले? असा संतप्त प्रश्न गावकर्‍यांनी उपस्थित केला असून घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे.