मेगा पद भरतीमध्ये ओबीसी आरक्षण धोरणाचे उल्लंघन

0
14

नागपूर,दि.12 :- शासनाने ओबीसीस नविन दिले नाही तरी चालेल ,पण जे मिळाले, ते तरी सरकारने हिरावून घेऊ नये, या भावनेसह राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चा तर्फे अतिरिक्त उपजिल्हाधिकारी मार्फत राज्य सरकारला निवेदन सादर करण्यात आले.राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चा तर्फे अतिरिक्त उपजिल्हाधिकारी मा. प्रकाश पाटील यांच्या मार्फत संबंधित तक्रार शासनाकडे सादर करण्यात आली.

राज्य सरकार तर्फे विविध विभागात पदभरतीच्या जाहिराती काढण्यात आल्या आहेत. उदा. सा. बा. विभागात कनिष्ठ अभियंता (स्थापत्य ) गट- ब ह्या पदाकरिता एकूण ४०५ जागांची काढलेल्या जाहिरातीत ओबीसीच्या १९% आरक्षणाची पायमल्ली करण्यात आली आहे. ७७ जागा ऐवजी मात्र ४७ जागा देण्यात आल्या. याच प्रमाणे अन्य विभागात काढलेल्याही जाहिरातीत ओबीसीच्या १९% आरक्षणाची पायमल्ली केल्याचे दिसून आले आहे. सरकारने नविन दिले नाहि तरी चालेल ,पण जे आहे, त्याची बूज राखली पाहिजे, या भावनेसह शासनाकडे तक्रारीसह निवेदन सादर करण्यात आले. या बाबत शासनाने जर फेरविचार केला नाही तर,संघटने तर्फे न्यायालयात दाद मागण्याचा इशारा ही देण्यात आला आहे.या वेळी राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चा मुख्यसंयोजक नितीन चौधरी, भूषण दडवे, ऍड. गिरीश दादिलवार, नईम पटेल, युवा नेते निकेश पिने, राम वाडीभष्मे, शुभम केदार, अनिकेत धोटे, शुभम वाघमारे, इंजि. प्रभाकर भडके, अजय यादव, आजम अन्सारी, शकील मोहम्मदी, नकी पटेल, मुकुल मोरे, राम वराडे, प्रणय ठाकरे, अमित कारेमोरे, पांडुरंग नागपुरे, भास्कर उरकुडे,अजय यादव ओबीसी महिला प्रियंका पांडुरंग नागपुरे, जयश्री उरकुडे आदी ओबीसी बांधव उपस्थित होते.