धापेवाडा उपसा सिंचन टप्पा क्र. १ च्या वीज बिलाकरिता निधी मंजूर

0
20

तिरोडा,दि.12 : तिरोडा-गोरेगाव विधानसभेचे आ. रहांगडालजे यांना सिंचनक्षेत्रावर नेहमी विशेष भर असून तालुक्यातील शेतकर्‍यांना कसे सक्षम बनविता येईल याकडे शासनस्तरावर नेहमी पाठपुरावा केला. याच अनुषंगाने धापेवाडा उपसा सिंचन टप्पा क्र. १ च्या वीज बिलाकरिता ५0 लाख ५८ हजार रूपयांचा निधी मंजूर करून देण्यात आला. यामुळे परिसरातील शेतकर्‍यांना मोठय़ा दिलासा मिळाला आहे.
विशेष म्हणजे, धापेवाडा उपसा सिंचन टप्पा क्र. १ शेतकर्‍यांसाठी वरदान ठरली असून यामुळे १0 हजार ४४७ हेक्टर जमीन सिंचनाखाली येत आहे. मागील वर्षी कॅनल दुरूस्तीमुळे शेतकर्‍यांना रब्बी पिकाकरिता पाणी सोडले गेले नाही. यावर्षी रब्बी पिकाकरिता यामध्ये शेतकर्‍यांसमोर वीज बिलाचा प्रश्न निर्माण झाला असून मागील खरीप २0१८ मध्ये ४000 हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळाला होता. व ५0 लाख ५८ हजार विद्युत देयक थकीत असल्यामुळे शेतकर्‍यांकडून वारंवार बीजबील माफ करण्याबाबत आमदारांकडे मागणी होत होती. सदर मागणीचा गांभीर्याने विचार करून आ. रहांगडाले यांनी तात्काळ कार्यकारी संचालक विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर यांचेशी चर्चा करून ५0 लाख ५८ हजार रूपये वीज बिलाकरिता निधी उपलब्ध करून खंडीत वीज पुरवठा पुर्ववत करण्यात आला. यापुढे रब्बी पिकाकरिता ८१ टक्के वीजबिल शासन तर १९ टक्के वीजबील शेतकरी भरणार आहे. यामुळे शेतकर्‍यांचा वीज बिलाचा प्रश्न सुटलेला असून रब्बीपिकांना जीवनदान मिळाले आहे.