25.3 C
Gondiā
Tuesday, August 4, 2026
Home विदर्भ चंद्रपूरात २७ जानेवारीला पवार समाजाचे वार्षिक स्नेहसमेंलन

चंद्रपूरात २७ जानेवारीला पवार समाजाचे वार्षिक स्नेहसमेंलन

0
38
चंद्रपूर,दि.२५ःः: क्षत्रिय राजाभोज पवार समाज बहुउद्देशिय संस्था चंद्रपूरच्यावतीने वार्षिक स्नेहसंमेलन व हळदी कूंकु कार्यक्रमाचे आयोजन रविवार (दि,२७) गायत्री मंदिर दाताला रोड चंद्रपूर येथे करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय क्षत्रिय पवार महासभेचे अध्यक्ष इंजि. मुरलीधर टेंभरे राहणार असून उद्घाटक म्हणून अखिल भारतीय क्षत्रिय पवार महासभेचे संघटन-सचिव खेमेंद्र कटरे उपस्थित राहणार आहेत.कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून जनसंवाद सचिव इंजि.एस.एम.पारधी,छगनलाल रहांगडाले तर प्रमुख पाहुणे म्हणून अ‍ॅड. विनायकरावजी वडस्कर, प्रा. रामप्रसाद हरिणखेडे, प्रेमलाल पारधी,सरपंच इंजी.डी.यु.रहांगडाले आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.कार्यक्रमाला जिल्ह्यातील समाजबांधवांना अधिकाधिक संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे